शेतीचा व्यवसाय म्हणजे बुडीचा व्यवसाय ठरत आहे. त्यामुळेच विदर्भातील अनेक शेतकरी आत्महत्या करताना दिसतात. पावसाची अनियमितता आणि बँकेचे, सावकाराचे कर्ज यामुळे शेतकरी वैतागून गेला आहे. त्यातच नवीन काही तरी प्रयोग करायचे म्हणजे शक्यच नाही. मात्र या सर्व गोष्टींवर मात करत विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील युवा शेतकरी संजय गटाडे ह्याने एक आगळीवेगळी शेती करण्याचा प्रयोग केला आहे. आणि त्याच्या या प्रयोगामुळे त्याचे जगभरात नावसुध्दा झाले आहे. संजय त्याच्या शेतात क्विंटलने धान्य नाही तर चक्क मोती पिकतो आहे. विश्वास बसत नाही ना.. पण हे खरे आहे. संजय या मोत्यांच्या शेतीतून दरवर्षी लाखो रूपये कमावतोय, सोबतच तो इतर शेतकऱ्यांना या मोत्यांच्या शेतीचे मोफत प्रशिक्षणही देतोय..
अगदी छोट्या गुंतवणूकीमध्ये जास्तीत जास्त कमावण्यासाठी मोत्यांची शेती हा एक चांगला पर्याय आहे. सध्या या मोत्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही बाजारात चांगली मागणी आहे. यामुळे या मोत्यांना चांगली किंमत मिळते. केवळ २ लाख रुपये गुंतवून केवळ दीड वर्षात तुम्ही २० लाखांपर्यंत उत्पन्न मिळवू शकतात. म्हणजेच महिन्याला १ लाखांपेक्षा जास्त रुपयांची कमाई...
असा पिकवा मोती
संजय 10 बाय 10 चौरस फुट तयार केलेल्या तळयात मोत्यांची शेती करतो. 3000 मोतींचे नग पिकवण्यासाठी त्याला 18 महिने लागतात. सर्वात आधी शिंपल्यांमध्ये साच्यात तो मोत्याचे बीज टाकतो. नंतर शिंपले बंद करून जाळ्याच्या सहाय्याने पाण्यात सोडतो. काही महिन्यानंतर या शिंपल्यांमध्ये मोती तयार होतो. संजय सांगतो की, वर्षभरात तो या शेतीतून 11 ते 12 लाख रूपये कमावतो. मोती तयार व्हायला 5 ते 6 महिने एवढा कालावधी लागतो. शिवाय शिंपल्यांची बीजे नदीतून मिळत असल्याने त्याचा उत्पादन खर्च कमी आहे.
विविध डिझाईन्सचे मोती
संजयने डिझायनर मोती तयार करण्याचे तंत्रही शोधून काढले आहे. मोती तयार करण्यासाठी त्याने खास साचे तयार केले आहेत. या साच्यांमध्ये गणपती, बुद्ध, क्रॉस अशा विविध आकारातील मोती त्याने तयार केलेत. बाजारात एका मोत्याला 300 रुपये प्रती नग एवढा भाव आहे.
उच्चशिक्षीत आहे संजय
संजय शेतकरी परिवारातील आहे. त्याने वकीलीचे शिक्षण घेतले आहे. पुढे नोकरी सोडून त्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. मोती कसे तयार होतात, याबाबत बालपणापासून त्याला कुतूहल होते. तो गडचिरोलीच्या अॅग्रिकल्चर कॉलेजमध्ये गेला. तेथून एका प्राध्यापकाच्या मदतीने त्याने पाण्यात मोती तयार करण्याचे तंत्र शोधून काढले.
मोत्यांचे प्रकार
नैसर्गिक, संवर्धित आणि कृत्रिम असे मोतींचे तीन प्रकार आहेत. त्यानुसार त्याचे रोपणही होते. कॅल्शिअम पदार्थ किंवा शिंपल्यापासून बनवलेले मणी किंवा केंद्रक मोती रोपणात वापरतात. शिंपल्यात ठराविक एका शिंपल्याचा तुकडा किंवा भुकटी रोपण करून गोड्या पाण्यात तो शिंपला 3 वर्षे ठेवला जातो. त्या शिंपल्यात तयार झालेला मोती संवर्धित मोती होय. हा मोती नैसर्गिक मोत्यासारखाच असतो. त्याची गुणवत्ताही अधिक असते.

No comments:
Post a Comment